निगडी येथे महिला आरोग्य तपासणी शिबीर

Written by

पिंपरी : प्राधिकरण, निगडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व लोकमान्य कॅन्सर अँड रिसर्च सेंटर चिंचवड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त १८ वर्षापुढील महिलांसाठी सवलतीच्या दरात कॅन्सर तपासणी व जनरल तपासणी शिबीर नुकतेच पार पडले.
सेक्टर क्रमांक २८ मधील संजय काळे मैदानावरील सभागृहात हे शिबीर झाले. चिंचवड विधानसभा महिला संघटक पल्लवी पांढरे यांनी या शिबिरासाठी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर मंगला कदम ह्यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाला वर्षा जगताप, अपर्णा मिसाळ, सारिका पवार, पुष्पा शेळके, मनिषा गटकळ, शीला भोंडवे, निर्मला माने, आशा शिंदे, आशा मराठे, मीरा कुदळे, सीमा हिमने, मेहेक इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे ह्यांनी केले, प्रास्ताविक महिला चिंचवड विधानसभा संघटक पल्लवी पांढरे यांनी केले. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. तसेच लोकमान्य हॉस्पिटलचे सुखदेव गोळे यांनी देखील मार्गदर्शन केले.
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares