नारायणगाव विकास सोसायटीच्या वतीने विद्यार्थ्यांना शिवप्रताप गरुडझेप चित्रपटाचे मोफत दर्शन

Written by

१९ ऑक्टोबर २०२२
नारायणगाव
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार व जेष्ठ अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या “शिवप्रताप गरुडझेप” हा चित्रपट नारायणगाव व वारूळवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना नारायणगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या वतीने आज मोफत दाखवण्यात आला. सुमारे २०० विद्यार्थी हा चित्रपट पाहण्यासाठी उपस्थित होते.

याप्रसंगी वारूळवाडी तसेच येडगाव व नारायणगावातील विद्यार्थ्यांचा चित्रपट पाहण्यासाठी मोठा प्रतिसाद लाभला. याप्रसंगी नारायणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण वाजगे, माजी चेअरमन व संचालक चंद्रकांत बनकर, रामदास तोडकरी, अरुणआबा कोल्हे, सिताराम खेबडे, आरती वारुळे, सिमा खैरे, सचिव गणेश गाडेकर, अजित वाजगे, रोहिदास केदारी, गणेश वाजगे, रामदास अभंग, राजेंद्र कोल्हे, राहुल गावडे, काशीद, नेहरकर, विनायक भुजबळ, निलेश मेहता, पंकज पाटे, जगदंब प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आशिष हांडे, मुख्याध्यापक श्री ढोले सर तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते. चित्रपट पाहिल्यानंतर शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी देखील राजमाता जिजाऊ साहेब छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी जयघोष करत जयजयकार केला.

 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares