नारायणगाव येथे मराठा विकास प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धा उत्साहात

Written by

शिवजयंतीचे औचित्य साधून नारायणगाव येथील मराठा विकास प्रतिष्ठाण यांनी नुकतेच आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानचे अध्यक्ष सह्याद्री भिसे, कार्याध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, माजी आमदार शरद सोनवणे, सरपंच योगेश पाटे, राहुल गरुड व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्ज्वलन व शिव प्रतिमेचे पुजन करून झाले.याप्रसंगी शरद सोनवणे यांनी शिवरायांचे विचार जिवनात आचरणात आणण्याची गरज असल्याचे सांगितले. योगेश पाटे यांनी नारायणगाव ची ओळख विविध कार्यातून झाली असून गॅस दाहिनी, ऐतिहासिक शिव छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, कोविड काळातील लोकांसाठी केलेली मदत ही सर्व नारायणगावकर व सहकार्यामुळेच झाले. तसेच शिवरायांची शिकवण आचरणात आणल्यामुळेच आपल्या कडून विविध कार्य होत आहे.

शिवरायांच्या जिवनातील विविध प्रसंग पोवाड्यातून स्पर्धकांनी सादर केले. यासाठी राज्यातून विविध सोळा वर्षाखालील पाच व खुल्या गटातील पाच स्पर्धकांचा ऑफलाईन पद्धतीने मुक्ताबाई समाज मंदिर येथे स्पर्धा पार पडल्या. कार्यक्रमासाठी राज्यातून विविध स्पर्धक उपस्थित होते. विजयी स्पर्धक पुढील प्रमाणे
लहान गट
सई आनंदराव – पारुंडे, जुन्नर
देवेश काळे – नारायणगाव
अनमोल हुंदळकर – पुणे
ईश्वरी वर्पे जुन्नर
कौस्तुभ कनिंगध्वज -आर्वी
पियूष सैद – मोशी पुणे
साई रोकडे जुन्नर
मोठा गट
दिव्यानंद नेवासे आणि टिम बुलढाणा
धनश्री संतोष ताम्हाणे जुन्नर
कार्तिक आढाव आणि टिम
सुशांत खैरे येणेरे.
पोवाडा स्पर्धेचे संयोजन दिपक वारुळे, जितेंद्र वाजगे, विजय नढे, रविंद्र वाजगे, सुहास शहा योगेश जुन्नरकर,अंबादास वामन, डॉ शिवाजी टाकळकर, शिरीष जठार, निरंजन भोसले, प्रविण पवार, संपत शिंदे, खजिनदार रमेश भोसले, संजय शिंदे यांनी केले. तसेच परीक्षण संगीत अध्यापक राहूल दुधवडे यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन मुळे यांनी तर आभार बाळासाहेब गिलबिले यांनी मानले.

Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares