नायगाव येथे दोन गटात हाणामारी; तिघे गंभीर जखमी

Written by

दि. २७/१२/२०२२
पिंपरी
पिंपरी : मावळातील नायगाव येथे सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दोन गटात जोरदार हाणामारी झाली असून यामध्ये कोयते, दगड याचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय यावेळी गोळीबारही करण्यात आल्याचे समजते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नायगाव येथे नवनाथ नथू चोपडे यांच्या घरासमोर किरकोळ वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. त्यात कोयते, दगड, पिस्तूल यांचा वापर केला गेला.या प्रकरणी दोन्ही गटानी परस्पराविरोधात तक्रारी दिल्या आहेत. पोलिसांनी अद्यापपर्यंत ८ जणांना अटक केली असून फरार झालेल्यांचा शोध पोलीस पथके घेत आहेत.
कामशेत पोलीस ठाण्यात मंगळवारी सकाळी सोमनाथ उर्फ स्वामी गायकवाड व आकाश शंकर लालगुडे यांनी परस्परविरोधात तक्रारी दिल्या आहेत. यावरून पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून या घटनेत योगेश अनंता गायकवाड, प्रमोद सोपान सांडभोर, मंगेश भीमराव मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत.
या गुन्ह्याचा पुढील तपास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप करत आहेत.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares