२२ डिसेंबर २०२२
आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले आहे. त्यांच्या विधानानंतर अनेक पक्षाच्या नेत्यांनी टीकाही केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही यावर प्रतिक्रिया देत भाजपावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रपित्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. त्यांचा(भाजपा) ‘न्यू इंडिया’ केवळ काही मित्रांना श्रीमंत बनवण्याचा आहे. तर बाकीची लोकसंख्या ही दीन आणि भूकेली आहे. आम्हाला हा ‘न्यू इंडिया’ नकोय. अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमृता फडणवीस यांच्या विधानावर टीका केली आहे.
Your email address will not be published.
Article Tags:
news