मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
०९ मार्च २०२२
मंचर
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील विघ्नहर गार्डन कार्यालय येथे करण्यात आले. “जागतिक महिला दिन” संपुर्ण जगभर विविध प्रकारे हा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नांदी फाउंडेशनच्या वतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विशेष म्हणजे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुर्वाताई वळसे यांचा सत्कार मनिषा सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पुर्वाताई वळसे सहसचिव राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र संचिलिका यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, गटशिक्षण अधिकारी तालुका आंबेगाव सविता माळी ,मनिषा सपकाळे क्रार्यक्रम अधिकारी आंबेगाव तालुका, सहकारी अरूणा पाचारणे, ज्योतीताई घोडेकर ,वैशाली वायकर, संध्या यळवंडे, धनश्री चौधरी, निलिमा वळसे जिल्हा परिषद शिक्षिका काठापुर,शिल्पा दिक्षित संचालिका स्वँग डान्स अँकेडेमी, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष सुषमाताई शिंदे,ईव्हेट मँनेजमेंट सुरेखा भोर,योगेश लोंढे आदी मान्यवर, शिक्षक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.
Your email address will not be published. Required fields are marked *
Article Tags:
news