दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला बहुमत

Written by

०७ डिसेंबर २०२२
दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला बहुमत मिळालं आहे या निवडणुकीत मुख्य लढत आप, भाजप आणि काँग्रेसमध्येच होती. भाजपने कडवी लढत दिली आहे. तर काँग्रेसला दुहेरी आकडा गाठण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागत आहे.
दिल्ली महापालिकेच्या २५० जागांसाठी ४ डिसेंबर रोजी मतदान झालं होतं. तर आज (७डिसेंबर) मतमोजणी पार पडत आहे. या निवडणुकीत २५० जागांसाठी एकूण १३४९ उमेदवार मैदानात होते. दिल्ली महापालिकेवर गेल्या १५ वर्षांपासून भाजपची सत्ता होती. मात्र यंदा आम आदमी पक्षाला दिल्ली महापालिकेची सत्ता काबीज करण्यात यश आलं आहे.
दिल्ली महापालिकेच्या २५० पैकी २३३ जागांचे निकाल (दुपारी २ वाजेपर्यंत) हाती आले आहेत. यात आम आदमी पक्षाला १२६ जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजप ९७ जागांवर विजयी झाली आहे. काँग्रेसने ७ जागांवर विजय संपादन केला आहे. तर ३ अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. अजूनही १७ जागांचे निकाल येणं बाकी आहे.
 

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares