दहावी बारावी बोर्ड परीक्षेसाठी एका वर्गात …विद्यार्थी! मुख्याध्यापकांना द्यावे लागणार हमीपत्र

Written by

दहावी बारावी बोर्ड परीक्षेसाठी एका वर्गात …विद्यार्थी! मुख्याध्यापकांना द्यावे लागणार हमीपत्र
कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नसून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत दहावी-बारावीची परीक्षा घेतली जात आहे. आता ‘शाळा तिथे परीक्षा केंद्र’ असणार आहेत. त्या केंद्रांवर तथा उपकेंद्रांवर एका वर्गात 25 विद्यार्थीच असतील. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील (परीक्षा केंद्र) सोयी-सुविधांबद्दल मुख्याध्यापकांना हमीपत्र द्यावे लागेल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
तरी माननीय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले आहे की सर्व मुलांनी आत्मविश्वास वाढून अभ्यास करावा दडपण घेऊ नये शक्य होईल तेवढ्या गोष्टी ह्या मुलांच्या बाजूने करण्यात येतील तसेच बोर्डाचे अध्यक्ष डॉक्टर शरद गोसावी यांनी सांगितलेले आहे परीक्षा या वेळेतच होतील आणि ठरलेल्या वेळेप्रमाणे होतील त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.
बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा सुरु झाली असून 3 मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. त्यानंतर 4 मार्च ते 7 एप्रिलपर्यंत त्यांची लेखी परीक्षा होईल. तत्पूर्वी, दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत चालेल. 15 मार्चपासून सुरु झालेली दहावीची लेखी परीक्षा 18 एप्रिलपर्यंत चालणार आहे. बोर्डाकडून आता परीक्षा केंद्रांची निश्चिती केली जात आहे. त्याअनुषंगाने शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांची, मुख्याध्यापकांची बैठक घेतली जात आहे. महाविद्यालयातील परीक्षार्थी, एकूण बाकांची संख्या, पाण्याची, वीज, पंखा, जनरेटर, इनव्हर्टर, मुला-मुलींची स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय, शिक्षक, लिपिकांची संख्या, मागच्या वर्षी परीक्षेचे मुख्य केंद्र कोणते होते, याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना द्यावी लागणार आहे.

तर शाळांमधील दहावीच्या परीक्षार्थींची संख्या, एकूण बाकांची व वर्गखोल्यांची संख्या, पाण्यासह इतर सोयी-सुविधा, शिक्षक, लिपिकांची संख्या अशा सर्व बाबींची माहिती बोर्डाला कळवावी लागणार आहे. त्यानुसार त्याठिकाणी परीक्षा केंद्र व उपकेंद्र दिले जाणार आहे.

Article Tags:
· ·
Article Categories:
Education

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares