दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द जाणून घ्या सत्य

Written by

दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत अशा प्रकारे होतील. हे नियम पाळणे आवश्यक
दहावी बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यासाठी राज्यभरात विद्यार्थी स्त्यावर उतरले होते. आता त्यांनी कायदेशीर मार्ग निवडला आहे.विद्यार्थ्याने दहावी व बारावीची नयोजित परीक्षा पुढे ढकलण्यासाठी हायकोर्टाचा दरवाजा ठावला आहे.  यातच परीक्षा रद्द होतील असे मेसेज व्हायरल होत आहेत तरी या मागचे आपण सत्य जाणून घेऊयात .
दहावी बारावी बोर्ड परीक्षा रद्द करा औरंगाबाद कोर्टात याचिका- विद्यार्थी संघटना👇👇

तरी माननीय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले आहे की सर्व मुलांनी आत्मविश्वास वाढून अभ्यास करावा दडपण घेऊ नये शक्य होईल तेवढ्या गोष्टी ह्या मुलांच्या बाजूने करण्यात येतील तसेच बोर्डाचे अध्यक्ष डॉक्टर शरद गोसावी यांनी सांगितलेले आहे परीक्षा या वेळेतच होतील आणि ठरलेल्या वेळेप्रमाणे होतील त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.
परीक्षेत विविध घटकांचा सहभाग –
सदर परीक्षांसाठी प्रामुख्याने मुख्याध्यापक, प्राचार्य, केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, परिरक्षक, मुख्य नियामक नियामक परीक्षक, लिपिक व चतुर्थश्रेणी कर्मचारी तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी व मंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी अशा घटकांचा समावेश असतो.
परीक्षेचा कालावधी
प्रचलित पद्धतीनुसार बारावीची परीक्षा 20 फेब्रुवारी दरम्यान व दहावीची परीक्षा एक मार्च दरम्यान सुरु करण्यात येते. तथापि चालू वर्षी नेहमीपेक्षा सुमारे दोन आठवडे उशिराने म्हणजेच पुढील कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत.  बारावीची लेखी परीक्षा चार मार्च 2022 ते 30 मार्च 2022 यादरम्यान होणार आहे. तर श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन 14 फेब्रुवारी 2022 ते 3 मार्च 2022 यादरम्यान होणार आहे. दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च 2022 ते चार एप्रिल 2022 होणार आहे. तर श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन 25 फेब्रुवारी ते 14 मार्च यादरम्यान होणार आहे.

हॉलतिकीट download करताना या गोष्टी बरोबर आहेत का नाही हे पहा अन्यथा परीक्षेस बसता येणार नाही 👇👇
विषय, माध्यम व प्रश्नपत्रिका संख्या –
मंडळाची परीक्षा सार्वत्रिक स्वरुपाची असून संपूर्ण राज्यात एकाच वेळी एकसमान प्रश्नपत्रिकेवर आयोजित केली जाते. यामध्ये वस्तुनिष्ठ, लघुत्तरी व दिर्घोत्तरी प्रश्नांचा समावेश असतो. बारावीसाठी 356 तर दहावीसाठी 158 प्रश्नपत्रिका असतील.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना  निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेता प्रचलित ऑफलाईन पद्धतीने आयोजित परीक्षांसाठी पुढील उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.
परीक्षा केंद्रे
प्रचलित पद्धतीनुसार मंडळाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतल्या जातात. विद्यार्थी ज्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत तेथेच त्यांना लेखी परीक्षा देता येईल. त्यामुळे त्यांना परिचित वातावरण मिळून परीक्षा देण्यास सुलभता वाटेल. तसेच परीक्षेसाठी कमी प्रवास करावा लागेल.

अभ्यासक्रम
कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे यापूर्वीच अभ्यासक्रमात 25% कपात करण्यात आली आहे. त्यामुळे लेखी परीक्षेचे आयोजन 75% अभ्यासक्रमावर करण्यात आले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रचलित पद्धतीनुसार विशेष सवलती देण्यात येतील.
प्रात्यक्षिक परीक्षा
कोरोमुळे बहुसंख्य शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना निर्धारित प्रात्यक्षिककार्ये पूर्ण करता आली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना याबाबत सवलत देण्यात आलेली आहे. प्रत्यक्ष प्रात्यक्षिक परीक्षेचे आयोजन शक्य न झाल्यास प्रात्यक्षिकाऐवजी लेखन कार्यावर आधारित प्रात्यक्षिक परीक्षेचे आयोजन केले जाईल. बारावी प्रात्यक्षिक कार्य हा भविष्यातील अभ्यासक्रमासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत प्रात्यक्षिकासाठी विषयनिहाय अभ्यासक्रमाच्या किमान 40% प्रात्यक्षिकांवर आधारित परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. दहावी शाळांमार्फत प्रात्यक्षिकासाठी विषयनिहाय अभ्यासक्रमाच्या किमान 40 % प्रात्यक्षिकांवर आधारित परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. 
परीक्षेची वेळ
विद्यार्थ्याचा लेखनाचा सराव कमी असल्यामुळे लेखी परीक्षेच्या 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे जादा वेळ तसेच 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटांचा जादा वेळ देण्यात आला आहे.

विशेष सवलत
कोणताही विद्यार्थी आजारी पडल्यास किंवा अपरिहार्य कारणामुळे श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत व तत्सम मूल्यमापन प्रात्यक्षिक / सबमिशन करून शकल्यास लेखी परीक्षेनंतर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना यासाठी पुन्हा संधी देण्यात येईल. यासाठी वेगळे शुल्क घेतले जाणार नाही.
सुरक्षात्मक उपाययोजना
सर्व परीक्षा केंद्रांवर कोरोनामुळे आजारी असलेल्या विद्यार्थ्यासाठी एक स्वतंत्र परीक्षा कक्ष असेल. जर एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेदरम्यान लक्षणे दिसली तर विद्यार्थ्याला स्वतंत्र कक्षात परीक्षा देण्याची मुभा असेल. जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रामार्फत परीक्षा केंद्राला आवश्यक ती वैद्यकीयमदत पुरवली जाईल.

विद्यार्थ्याच्या आरोग्यास प्राधान्य –
सर्व परीक्षांसाठी विद्यार्थी व संबंधित घटकांकरिता कोविड- १९ संदर्भात शासन व आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालन करणे अनिवार्य असेल. याबाबतच्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील..
विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका –
कोरोना संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर किमान एकते दीड तास अगोदर उपस्थित राहणेबाबत कळविण्यात येईल. विद्यार्थ्याला दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका दिली जाईल. यामुळे ती सोडविण्याबाबत त्याला नियोजन करता येईल.

Article Tags:
· ·
Article Categories:
Education

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares