तुलसी विवाह च्या शुभ मुहूर्तावर पहिल्या अष्टविनायक लक्झरी बस यात्रेस आज पासून प्रारंभ

Written by

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी
०५ नोव्हेंबर २०२२
ओझर
श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष श्री गणेश कवडे यांच्या संकल्पनेतून सर्व अष्टविनायक देवस्थान ट्रस्ट ला एकत्रित घेवून यशस्वी हेलिकॉप्टर सेवा सुरु केल्यानंतर मुख्यता मध्यम वर्गीय भाविकांना देखील अष्टविनायक दर्शन व्हावे म्हणून देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश कवडे व विश्वस्त मंडळाने लक्झरीबस सेवेद्वारे अष्टविनायक यात्रा सुरु करण्याचा मानस केला.श्री क्षेत्र ओझर श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट अष्टविनायकांपैकी एक अति पवित्र असे तीर्थक्षेत्र मानले जाते.भाविकांना सुखसोई उपलब्ध करून देण्याचे काम श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट करत आहे.

 
 
आज तुलसीविवाहाच्या शुभमुहूर्तावर पहिल्या अष्टविनायक दर्शन यात्रेस प्रारंभ करण्यात आला.प्रवासासाठी देवस्थान ट्रस्ट ने लक्झरी वाहनाची व्यवस्था केली होती.त्यावर देवस्थान ट्रस्ट भाविकांना देत असलेल्या विविध सुविधांचे चित्रिकरण करण्यात आले होते.वाहनास फुलांची सजावट करण्यात आली होती. पहाटे ६ वाजता सर्व प्रवासी भाविकांना देवस्थान ट्रस्ट च्या भक्तभवन क्र ४ या इमारती मध्ये चहा नाष्टा देण्यात आला.

प्रवासी भाविकांना प्रवासा दरम्यान सूचना देण्यात आल्या व ठीक ७.०० वा प्रवासी भाविक यांच्या शुभास्ते आरती संपन्न झाली. या प्रसंगी बस सेवेचे उद्घाटन करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध ह.भ.प.श्री पंकज महाराज गावडे महाराष्ट्रातील एक युवा प्रबोधनकार व त्यांच्या पत्नी सौ गावडे यांचे शुभास्ते फीत कापण्यात आली.व सोबत उद्योजक श्री शिवकुमार नेलगे साहेब यांच्या वतीने श्रीफळ वाढविण्यात आले संचालक साई ग्रुप कंपनी यांची उपस्थिती या उद्घाटन सोहळा साठी लाभली.

प्रबोधनकार गावडे यांनी देवस्थान ट्रस्ट भाविकांसाठी राबवत असलेल्या नवनवीन उपक्रमांचे कौतुक केले अध्यक्ष गणेश कवडे व विश्वस्त मंडळ भाविकांनां देत असलेल्या सुखसोईचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी देवस्थान ट्रस्ट चे विद्यमान अध्यक्ष गणेश कवडे खजिनदार कैलास घेगडे विश्वस्त बी.व्ही मांडे,आनंदराव मांडे,किशोर कवडे, मंगेश मांडे,विजय घेगडे,यांनी सर्व यात्रा प्रवासी यांना शुभेच्छा दिल्या.देवस्थान ट्रस्ट ने सर्वसामान्य भाविक जनतेसाठी सुरु केलेल्या उपक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी ओझर गावच्या सरपंच सौ.मथुरा कवडे,उपसरपंच विठ्ठल जाधव ग्राविकास विकास संस्था अध्यक्ष महेश कवडे माजी सरपंच ओझर जगन्नाथ कवडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्तात्रय कवडे व्यवस्थापक अशोक घेगडे,गणेश टेंभेकर,पंकज गाडेकर,जयेश जोशी , ग्रामस्त विकास कवडे, आपला आवाज न्यूज चॅनलचे पत्रकार मंगेश शेळके यांची उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरापैकी माजी सरपंच जगन्नाथ कवडे यांनी प्रथम लाभ घेण्याऱ्या भाविकांचे स्वागत करून देवस्थान ट्रस्ट ला शुभेच्छा देवून मनोगत व्यक्त केले .आलेल्या मान्यवरांना शुभेच्छा व प्रमुख उपस्थितांचे शब्दरुपी आभार देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त मंगेश मांडे यांनी मानले.

 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares