तीन तारखेनंतर जर मशिदीवरील भोंगे वाजले तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा – राज ठाकरे

Written by

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०२ मे २०२२
औरंगाबाद
आपण महापुरुषांच्या फक्त जयंती साजरी करतो. भाषण सुरू असताना बांग सुरू झाले तेव्हा राज ठाकरेंनी पोलिसांना सांगितले की हे अगोदर बंद करा. जर हे सरळ सरळ ऐकत नसतील तर महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे हे याना दाखवून देऊ. यानंतर महाराष्ट्रात काय होईल हे सांगता येणार नाही. महाराष्ट्राने देशाला भरभरून दिले. आजच्या भाषणात राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. पवार साहेब आपण जातीजातीमध्ये भेद निर्माण करतात याने दुही माजते. माझे दोन भाषणं झाली लगेच फडफडायला सुरवात झाली. शरद पवार साहेब नास्तिक आहेत असे मी बोललो तर झोंबले. पवार कधीही भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत. तुमची कन्याच लोकसभेत बोलली पवार साहेब नास्तिक आहेत.
पुस्तक आहे माझे जीवन चरित्र त्याच्यामुळे मी हिंदू धर्माच्या प्रचारासाठी केलेला विरोध म्हणून हिंदू व्यवस्थापन करणार आहे माझे आजोबा होते. महाराष्ट्रात नवरात्र उत्सव साजरे करणारे माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे होते. राष्ट्रवादी चा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण सुरू झाले. छत्रपती शिवाजी महाराज घराघरात पोहचवले त्यांच्या वृद्धापकाळात मध्ये पवार साहेबांनी आमच्या बाबासाहेब पुरंदरे यांचा त्रास द्यायला सुरुवात केली. तुमची केंद्रात सत्ता होती कृषी मंत्री होतात मग का नाही जेम्स लेनला फरफटत आणले. जातीपातीच्या विषयापासून तुम्ही सर्वांनी दूर राहिले पाहिजे. शरद पवारांना हिंदू शब्दांचीच एलर्जी आहे. लाऊड स्पीकर चा विषय मी कधीही अचानक काढलेला नाही. लाऊडस्पीकर हा धार्मिक विषय नाही. जर तुम्ही धार्मिक विषय करणार असाल तर तसेच उत्तर द्यावे लागेल.
जर सरळ सरळ ऐकत नसतील तर एकदा काय ते होऊनच जाऊद्या राज ठाकरेंचा इशारा
मला दंगली घडवायच्या नाहीत. देशातील सगळे लाऊडस्पीकर खाली उतरवले पाहिजेत. उत्तर प्रदीहसमध्ये भोंगे खाली उतरवले मग महाराष्ट्रात का नाही. माझी शासनाला विनंती आहे आज १ तारीख आहे ३ तारखेला ईद आहे ४ तारखेला लाऊडस्पीकर खाली उतरवले पाहिजे. जर असे झाले नाही तर महाराष्ट्रातील जनतेला माझी विनंती आहे सगळ्या मासिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चाळीसा जोरजोरात म्हणाव्यात. सामाजिकदृष्ट्या एव्हडे दिवस हा प्रलंबित प्रश्न एकदाचा निकाली काढावा.
सभेवेळी जर बांग सुरू झाला तर पोलिसांना त्यांना लगेच रोखा. माझ्या संपूर्ण देशवासियांना विनंती आहे हे सगळे भोंगे उतरवले गेलेच पाहिजे. अभि नही ती कभी नही. जर तीन तारखेपर्यंत हे उतरवले नाही तर चार तारखेपासून तुम्हीही हिंदू बांधवानी दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares