तर .. विद्यार्थ्यांना प्रवेशात मुदतवाढ.
बीएचएमएस, बीएएमएस, बीपीटीएच, बीयूएमएस, बीएस्सी नर्सिंग, बीओटीएच, बीएएसएलपी अशा वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना राज्य कोट्यांतर्गत पहिल्या फेरीतून प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार या अभ्यासक्रमांना येत्या शनिवारीपर्यंत (१९ फेब्रुवारी) प्रवेश घेता येणार आहे,’ अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त आर. एस. जगताप यांनी बुधवारी दिली आहे.
सीईटी सेलकडून वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार प्रवेशाच्या पहिल्या फेरीत गुणवत्तायादीत नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना बुधवारपर्यंत (१६ फेब्रुवारी) आपला प्रवेश निश्चित करायचा होता. त्याचप्रमाणे ‘स्टेटस रीटेन्शन फॉर्म’ भरण्याची मुदत होती.
‘या’ परीक्षा का घेता? शिक्षक संघटना आक्रमक, ठराव रद्द करण्याची मागणी👇👇
या शाळा ,कॉलेज 1 मार्चपासून सुरु होणार..👇👇
अनेक विद्यार्थ्यांना विविध कारणांमुळे प्रवेश निश्चित करता आला नाही. त्यामुळे प्रवेश घेण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन सीईटी सेलने प्रसिद्धीपत्रकाद्वारे मुदतवाढ करण्यात आल्याची माहिती दिली. या मुदतीनंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नसल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

Article Categories:
Education