डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेंतर्गत दोन लाभार्थ्यांना ५०० रुपयांत वीज जोडणी – सोमनाथ माने, उपकार्यकारी अभियंता, शिरूर

Written by

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
०७ डिसेंबर २०२२
शिरूर
शासनाच्या माध्यमातून महावितरण कंपनीमार्फत, डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना राबविण्यात येते. त्या अंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना नवीन घरगुती वीजजोडणी उपलब्ध करून देण्यात येते. त्यात अर्ज भरल्यावर व तो मंजूर झाल्यानंतर विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील १५ कार्यालयीन दिवसांत वीजजोडणी करण्यात येते.
प्रत्येक घर प्रकाशमान” या योजनेमुळे, गोरगरिबांना केवळ ५०० रुपयांत वीज जोडणी मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या महावितरण केंद्राशी गरजू ग्राहकांनी संपर्क साधावा असे आवाहन महावितरण कडून तमाम जनतेला करण्यात आले आहे. त्यासाठी www.mahadiscom.in या संकेत स्थळाचा वापर करावा असेही सांगण्यात आलेय.

याच पार्श्वभूमीवर शिरूर येथेही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी रामलिंग रोडवरील जाधव मलयातील राजविजय जाधव व गोलेगाव रोड येथील कुंडलिक लोंढे या लाभार्थींना कनेक्शन देण्यात आलेय. या वेळी महावितरण चे शिरूर येथील उपकार्यकारी अभियंता सोमनाथ माने हे स्वतः उपस्थित होते. तर त्यांच्या समवेत सहाय्यक अभियंता महेश बेसुळके व त्यांचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता. लाभार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares