डॉ.अमोल डुंबरे ठरले आयर्न मॅन

Written by

दिपक मंडलिक
ओतूर प्रतिनिधी
१४ मार्च २०२२


पोहणे, धावणे, आणि सायकल चालविणे अशा तीनही स्पर्धा प्रकारामध्ये शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या ट्रायथलॉन स्पर्धेमध्ये कॅन्सर तज्ञ डॉ.अमोल डुंबरे यांनी यश संपादन करून आयर्न मॅन हा किताब पटकावला. शनिवार दि. ५ मार्च २०२२ रोजी दुबई येथे पार पडलेल्या ‘आयर्न मॅन ७०.३’ या ट्रायथलॉन स्पर्धेमध्ये १२५ देशांचे २५०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. आयर्न मॅन हि स्पर्धा पूर्ण करणारे डॉ.अमोल डुंबरे हे पुणे जिल्ह्यातील पहिले कॅन्सर तज्ञ व जुन्नर तालुक्यातील पहिलेच व्यक्ती ठरले आहेत.

एकदिवसीय आयर्न मॅन हाफ ही स्पर्धा होती. यामध्ये पोहणे : १.९ किलोमीटर – १ तास १० मिनिटे, सायकलिंग : ९० किलोमीटर – ४ तास २० मिनिटे, धावणे : २१ किलोमीटर : ३ तासात पार करावयाचे होते. हे सर्व खेळाचे प्रकार साडेआठ तासात सलग पूर्ण करावयाचे होते. जोराचा वारा, दमट वातावरण, उष्णता आणि समुद्रातून पोहणे या सर्व कसरतीतून सर्व टप्पे सलग पार करत आठ तासात डॉ. डुंबरे यांनी हि स्पर्धा पूर्ण करून आयर्न मॅन हा किताब पटकावला. तिन्ही सपर्धेचे मिळून ७० मैल अंतर एकूण भरत आहे. त्यामुळे ही स्पर्धा एक मैलाचा दगड ठरली आहे. डॉ.डुंबरे यांनी कामाची जबाबदारी तसेच रुग्णांचा व्याप सांभाळत गेली वर्षभर या स्पर्धेची तयारी करत होते.

ही खडतर स्पर्धा पूर्ण करणारे जुन्नर तालुक्यातील पहिलेच आयर्न मॅन अशी ओळख डॉ.डुंबरे यांना मिळाली आहे. यामुळे त्यांचा सत्कार जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी सन्मानचिन्ह देऊन केला. यावेळी जुन्नर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सायकल प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सत्कार समारंभाचे आयोजन ओतूर सायकल ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते. तरुणांनी व्यसनाकडे न वळता व्यायाम करावा आणि अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यानिमित्ताने आमदार अतुल बेनके व डॉ.अमोल डुंबरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवृत्त तहसीलदार शंकर कचरे, सूत्रसंचालन भाऊसाहेब खाडे तर जयसिंग डुंबरे यांनी सर्वांचे आभार मानले.
 
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares