ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर आधीपासून एकत्रच आहे – चंद्रशेखर बावनकुळे

Written by

०५ डिसेंबर २०२२
सध्या शिवसेना ठाकरे गटाची आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. यासाठी लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक होणार असल्याचंही बोललं जातंय. ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर आधीपासून एकत्रच आहेत असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, प्रकाश आंबेडकर म्हणजे दलित, मागासवर्गीय मतं आहेत का? आंबेडकरांनी सगळी मते त्यांच्याकडे घेतली आहेत का? मी परवा आदिवासी नंदूरबारमध्ये होतो. ७५ हजार आदिवासी कुटुंबांनी धन्यवाद मोदीजी हे पत्र लिहिलं. त्यांनी हे पत्र का लिहिलं? आदिवासी समाजातील एका महिलेला राष्ट्रपती केलं म्हणून त्यांनी मोदींचं धन्यवाद केलं.
आदिवासी समाज कोणाची जहागिरी आहे का? तो समाज आहे आणि समाज म्हणूनच निर्णय करत असतो. तो कोण्या नेत्याच्या म्हणण्यानुसार निर्णय करत नाही. त्या समाजाला आपल्या हिताचं काय हे कळतं. मोदी आपलं हित जोपासत आहेत हे त्यांना कळतं. मागासवर्गीय समाजालाही वाटतं की मोदी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर संविधानाचं रक्षण करत काम करत आहेत. त्यामुळे मागासवर्गीय मतं कोणा एकाची जहागिरी नाही, असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं.
चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर आधीपासून एकत्रच आहेत. आज केवळ दाखवण्यासाठी एकत्र बसतील. हे सर्व आतून एकच आहेत. कोणतीही मतं कोणाची जहागिरी नाही. जेव्हा लोकांना वाटतं की हा पक्ष आमच्या हिताचा आहे तेव्हा ते त्या पक्षाला मतं देतात. कोणी म्हणत असेल की मागासवर्गीय मतं माझ्याकडे गठ्ठा आहे आणि मी इकडे देणार, तिकडे देणार, तर मतदार आता कधीही कोणाच्या म्हणण्यावर इकडे तिकडे जात नाही. जो स्थानिक पातळीवर जनतेला मदत करतो, जनतेचे कामं करतो त्यांच्यामागे लोकं उभे राहतात. सध्या लोक शिंदे-फडणवीस सरकारच्या मागे आहेत, मोदींच्या मागे लोक आहेत. त्यामुळे यांच्या युतीने महाराष्ट्रात काहीही फरक पडत नाही,” असं बावनकुळे यांनी सांगितलं.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares