ठाकरे गटाची पक्षचिन्हाबाबतची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Written by

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ नोव्हेंबर २०२२
ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात निवडणूक आयोगाच्या शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह गोठवण्याच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. पण ही याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे. ठाकरेंच्या गटाने दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारीदेखील सुनावणी झाली होती. त्यानंतर आज सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाची याचिकाच कोर्टाने फेटाळून लावली.
पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवणं किंवा इतर निर्णय घेण्याचा सर्व अधिकार निवडणूक आयोगाला आहे, असं म्हणत दिल्ली हायकोर्टाने याचिका फेटाळली आहे. दिल्ली हायकोर्टाच्या हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय.शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर काल जवळपास एक ते दीड सात सुनावणी झाली होती. या सुनावणी दरम्यान निवडणूक आयोगाने ठाकरे गटाची भूमिका सविस्तर ऐकून घेतली होती. त्यानंतर सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares