जुन्नर तालुक्यातील ४७ कर्तृत्ववान व्यक्तींचा सह्याद्री व्हॅली यशप्राप्ती पुरस्कार देऊन गौरव

Written by

दि. ०७/०१/२०२३
मंगेश शेळके : ओझर प्रतिनिधी
ओझर
‘आपला आवाज’  न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक अतुलसिंह परदेशी यांचाही गौरव 
ओझर : जुन्नर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४७ कर्तृत्ववान व्यक्तींचा शनिवारी सह्याद्री व्हॅली यशप्राप्ती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये ‘आपला आवाज’ या अग्रगण्य न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक अतुलसिंह परदेशी यांचाही गौरव करण्यात आला.
मुंबईतील पीपल्स आर्ट सेंटर ही संस्था हा उपक्रम गेली अनेक वर्षे राबवित आहे. या वर्षी जुन्नर तालुक्यातील आपला आवाज न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक अतुल परदेशी तसेच तसेच कृषिरत्न अनिल तात्या मेहेर ,गणेश भाऊ कवडे ,डॉक्टर सदानंद राऊत ,शिवाजीराव चाळक, पत्रकार भरत अवचट,उत्तम सदाकाळ, जितेंद्र बिडवई, संजय नलावडे, विठ्ठल शितोळे, शंकर कचरे, सुलोचना नलावडे, सुंदर कुऱ्हाडे, शौर्य काकडे,अरविंद ब्रम्हे आदी 47 जणांना ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉक्टर दीपक शिकारपूर, युवा नेते अमित बेनके ,निवृत्त न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी सह्याद्री व्हॅली यश प्राप्ती पुरस्कार स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी ओझर गावचे सर्व ग्रामस्थ ,विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी,आपला आवाज न्यूज चॅनलचे निवासी संपादक पवन गाडेकर, प्रतिनिधी मंगेश शेळके, माजी सरपंच जगनशेठ कवडे त्याचप्रमाणे राजकीय आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, वैद्यकीय, कृषी व पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी भोईर यांनी केले.
 
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares