जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दातखिळेवाडी शताब्दी महोत्सव २०२२

Written by

लक्ष्मण दातखिळे
०४ एप्रिल २०२२
जुन्नर / दातखिळेवाडी
रक्तदान शिबीर वक्तृत्व स्पर्धा व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दातखिळेवाडी या शाळेचा शताब्दी महोत्सव दि. ०२ व ०३ एप्रिल रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या शताब्दी महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुल परदेशी, माजी सभापती बाजीराव ढोले, दुध संघाचे संचालक भाऊसाहेब देवाडे, विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेचे संचालक अरूण पारखे, निवासी संपादक पवन गाडेकर, पोलीस पाटील सत्यवान घोगरे, रवी पानसरे, बाळासाहेब घोगरे आजि माजी विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.
आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन
दातखिळेवाडी सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या जिल्हा परिषद शाळेला आज १०० वर्ष पूर्ण झाली. एखाद्या शाळेला १०० वर्षे पूर्ण होणं म्हणजे त्या शाळेत शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, गावासाठी हा अभिमानाचा क्षण. आज या कार्यक्रम प्रसंगी माजी विद्यार्थी, शिक्षक व दातखिळेवाडी ग्रामस्थांचे शताब्दी महोत्सवानिमित्ताने मान्यवरांनी अभिनंदन केले.

माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन आयोजित केलेल्या शताब्दी महोत्सवाचे आमदार अतुल बेनके यानी कौतुक करत शंभर वर्ष ज्ञानदान करणा-या शाळेने व शिक्षकांनी असंख्य विद्यार्थांना घडवले असून ते आज आपल्या परिवारासोबतच आपल्या गावाचे आणि जुन्नर तालुक्याचे नावलौकिक करीत असल्याने भविष्यात ही दातखिळेवाडी गावासाठी काहीही मदत लागली तर मी शंभर टक्के पुर्ण करणार असा शब्द आमदार अतुल बेनके यानी दिला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दातखिळेवाडी चे १०० वर्षाचे ज्ञानदान पाहता शाळेला पुणे जिल्हा परिषदेकडून ‘ आदर्श शाळा पुरस्कार ‘ मिळाला पाहिजे आणि ही पुणे जिल्ह्य़ातील जिल्हापरिषद शाळा पॅटर्न म्हणून राज्यात नावारूपाला आली पाहिजे यासाठी आपला आवाज न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून शाळेच्या ज्ञानदान कार्याला प्रसिद्धी देण्यात येईल असे आश्वासन आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुल परदेशी यांनी दिले.

शताब्दी निमित्त मुलांची आणि ग्रामस्थांची गावातून प्रभात फेरी, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, योग शिबिर, महिला आरोग्य विषयक मार्गदर्शन, आजी माजी शिक्षकांचा सत्कार व माजी विद्यार्थ्यांचे मनोगत आदी कार्यक्रम घेण्यात आले. या शताब्दी कार्यक्रमासाठी दातखिळेवाडी गावचे सर्व आजी माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्व मुंबईकर, पुणेकर मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चैतन्य दातखिळे यांनी केले तर सूत्रसंचालन आपला आवाज न्यूज नेटवर्क चे निवेदक लक्ष्मण दातखिळे यानी केले, आभार पत्रकार प्रा. मनोज दातखिळे यांनी मानले.

 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares