२४ डिसेंबर २०२२
पंढरपूरमधील कॉरिडॉरच्या मुद्द्यावरुन स्थानिक पातळीवरील राजकरण चांगलेच तापले आहे. वाराणसी आणि तिरूपतीच्या धर्तीवर तीर्थक्षेत्र पंढरपूर कॉरिडॉर होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २०३० कोटी ७० लाख रूपये खर्चा विकास आराखडा तयार केला असताना हा कॉरिडॉर रद्द व्हावा या मागणीसाठी पंढरपुरात सर्वपक्षीय आंदोलन सुरू आहे.
हा कॉरिडॉर रद्द न झाल्यास स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या पदाधिका-यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे. असं असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र या कॉरिडॉरसंदर्भात ठाम असून काहीही झालं तरी हा कॉरिडॉर तयार होणारच असं सांगत आहेत. मात्र आता याच मुद्द्यावरुन थेट फडणवीसांची उपमुख्यमंत्रीपदाची खुर्चीही जाईल असा इशारा भाजपाचेच माजी खासदार सुब्रमण्यम स्वामींनी दिलाय.
देवेंद्र फडणवीस सांगत आहेत की पंढरपूरचं कॉरिडॉर होणारच. कोणीही मध्ये आलं तरी पंढरपूर कॉरिडॉर होणार असं ते म्हणत आहेत, असं सांगत पत्रकाराने स्वामींना फडणवीसांच्या भूमिकेवरुन प्रश्न विचारला. त्यावर स्वामींनी, मी आव्हान देऊन सांगतो की नाही होणार आणि तो जास्त बोलला तर उपमुख्यमंत्रीही राहणार नाही, असं म्हणत फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत मत मांडलं.
Your email address will not be published.

Article Tags:
news