जाधववाडी उर्दू शाळेत विद्यार्थ्यांची गैरसोय

Written by

१९ डिसेंबर २०२२
पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिखली जाधववाडी येथे उर्दू माध्यमाच्या शाळेची इमारत तयार झालेली असतानाही विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसविण्यात येत आहे . त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे . या प्रकारामुळे पालक वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे . येथे पालिकेची बालवाडी ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत . वर्ग खोल्या नसल्याने त्या विद्यार्थ्यांना व्हरांडात बसावे लागत आहे . उघड्यावर बसत असल्याने विद्यार्थ्यांना उन्ह , वारा व पावसाचा त्रास होत आहे . या संदर्भात वारंवार तक्रारी केल्यानंतर पालिकेने नवीन इमारत बांधली आहे.
इमारतींचे काम पूर्ण होऊनही त्या ठिकाणी वर्ग खोल्यात शिक्षण देण्यास सुरूवात करण्यात आलेली नाही . त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांची गैरसोय होत आहे . लवकरात लवकर नव्या इमारतीमध्ये वर्ग खोल्या सुरू कराव्यात . अन्यथा आंदोलनाचा इशारा अल्पसंख्याक विकास महासंघाचे अध्यक्ष रफिक कुरेशी यांनी आयुक्त शेखर सिंह यांना दिला आहे . या वेळी समीर शेख , आफनाझ शेख , अजिम शेख , नाना शेख आदी उपस्थित होते . या संदर्भात शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले की , अद्याप स्थापत्य विभागाकडून नवीन इमारत शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत झालेली नाही . इमारत हस्तांतर होताच आयुक्तांची मान्यता घेऊन वर्ग त्या ठिकाणी भरविण्यात येतील.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares