किरण वाजगे
कार्यकारी संपादक
११ मार्च २०२२
नारायणगांव
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जयहिंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कुरण मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या वतीने सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहण्यात आली.
दरम्यान जयहिंद औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या वतीने देखील जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभुमीवर जयहिंद शैक्षणिक संकुलात कार्यरत असणाऱ्या सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या संचालिका अंजली गुंजाळ व इंदूमती गुंजाळ यांच्या हस्ते संस्थेत कार्यरत असणाऱ्या महिलांना टिफिन बॉक्स भेट म्हणून देण्यात आले. तसेच गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
संकुलातील सर्व महिलांचा सन्मान
कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. जे. गरकल यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केले आटोकाट प्रयत्न व कष्ट यामुळे आज समाजात स्त्रियांनी आपल्या कार्यकर्तुत्वाच्या जोरावर एक वेगळी ओळख मिळवली असून सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या कार्यामुळेच खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा जागर सुरू झाला व त्यामुळे आज येथे सर्व सावित्रीच्या लेकी येथे उपस्थित आहेत. यावेळी सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्यामली अकोलकर व आभार प्रदर्शन डॉ. वैशाली धेंडे यांनी मानले.
Your email address will not be published. Required fields are marked *
Article Tags:
news