छ. शिवाजी हायस्कुल भोर येथे इ. १० वी, १९९२ बॅचचा स्नेहमेळावा ३० वर्षांनी संपन्न

Written by

प्रत्येकाच्या जीवनात त्याच्या शालेय जीवनाला खूप महत्व असते. त्यातल्या त्यात हायस्कुलचे शिक्षण व १० वी ची बॅच. परंतु १० वी नंतर विद्यार्थी शिक्षणानिमित्त, पालकांच्या बदलीमुळे व पुढे स्वतःच्या नोकरी, व्यवसायानिमित्त अशा विविध कारणांमुळे विखुरले जातात. परंतु जर तब्बल तीस वर्षांनी हे सर्व मित्र आपल्या चाळीशी पंचेचाळिशीत एकत्र आले तर आनंदाला पारावर राहत नाही. याच पार्श्वभूमीवर भोर येथील छत्रपती शिवाजी हायस्कुलचे, इ. १० वी च्या १९९२ बॅच चे गेट टू गेदर नुकतेच पार पडले. आणि पुन्हा एकदा ३० वर्षांनी सर्वजण आपल्या शाळेत आतुरतेने जमा झाले.
महाराष्ट्रातील एक नावाजलेली एक शिक्षण संस्था म्हणजे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर. संस्थेचे संस्थापक दिवंगत डॉ. बापूजी साळुंखे, तसेच हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या, शालेय परिसरात असणाऱ्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अनेकांनी शाळेबाबतच्या आपल्या आठवणी यावेळी विशद केल्या. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य बी के वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली, उपप्राचार्य एस एस सरवदे यांनी सर्वांना संबोधित केले. यावेळी तत्कालीन प्राचार्य व संस्थेचे संचालक डी एल पाटील यांच्या कडक शिस्तीची सर्वांनीच आठवण काढली. इंग्रजीच्या आफळे मॅडम व साळुंखे सर, शारीरिक शिक्षण व समाजशास्त्राचे जाधव सर, माने सर, काझी सर, विज्ञानचे शिंदे सर, गणिताच्या वाघ मॅडम, भूमितीचे काटकर सर, हिंदीचे शेंदूरणे सर, खान व धामणेकर मॅडम, मराठीचे पत्की सर, चित्रकलेचे कुंभार सर, संगीतचे नारागुडे सर, संस्कृतचे नेहते सर, इंग्रजीचे घाडगे सर, संगणकचे घोटाळकर सर, पवार सर, स्काऊट व गाईड च्या मदने मॅडम, हिंदीच्या दीक्षित मॅडम व शेंदुरे सर, लोहार, कुलकर्णी व एम पी पाटील सर आदींच्या आठवणींना उजाळा दिला.
हायस्कुलमधील कार्यक्रमानंतर भोर जवळील निसर्गरम्य भाटघर धरण क्षेत्राजवळ व पसुरे येथील एक वर्ग मित्र विजय शेलार यांच्या तवा या रिसॉर्टवर एकत्र जमत, छान गप्पा गोष्टी करत व आपापली सद्य ओळख सांगत, सुख दुःखे वाटून घेण्याचा प्रयत्न केला. सर्वचजण जरी आपापल्या आस्थापनेवर चांगल्या पदावर असले तरीही प्रत्येकजण आपले मूळ पद विसरून, अगदी दहावीच्या मुलांसारखा शिस्तबद्ध व लहान होऊन वागत होता. यावेळी सध्या विविध ठिकाणी आपल्या नोकरी व व्यवसायानिमित्त गेलेले अनेकजण, आवर्जून उपास्थित होते. त्यात या ग्रुपला एकत्र जोडणारे आय टी इंजिनियर अनिसा डांगे, विप्रो इंडिया पुणे चे सिनियर प्रोजेक्ट डिलिव्हरी मॅनेजर प्रशांत मोरे, रिलायन्स लाईफ सायंसेस मुंबई चे DGM हसन नालबंद उपस्थित होते. तसेच अंबेजोगाई, जी. बीड येथे कार्यरत असलेले नायब तहसीलदार मिलिंद गायकवाड, नसरापूर येथील व्ही एम आठवले माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक राहुल शेटे, व्हेटरनरी डॉ. मोहन बांदल, बालाजी स्नॅक्स सेंटर कात्रज च्या प्रोप्रा. तृप्ती क्षीरसागर (प्रधान), फ्रेजिनियस काबी इंडिया प्रा. ली. गोवा येथील सिनियर सुपरवायझर आनंदा महांगरे, टेक्नो इंजी. प्रा ली. पिरंगुट चे प्लांट हेड विजय कारंडे, महिंद्रा ऑटोमोबाईल्स सातारा चे सुनील बोराटे, के इ एम हॉस्पिटल मुंबई येथील लॅब टेक्निशियन रुपाली मेडेकर, देसाई इलेक्ट्रॉनिक्स प्रा ली खेड शिवापूर चे AGM प्रसाद वीर, पोंबर्डी – भोर येथील अगरबत्ती कारखानदार व केबल ऑपरेटर दत्तात्रय खोपडे, भोर प्रा. शिक्षक सो. चे माजी चेअरमन व शिक्षक नेते पंडित गोळे, मार्केटिंग सेल्स मुंबई चे भाऊ म्हसुरकर, वेंकटेश्वरा ह्याचरिज शिरवळ चे सुपरवायजर शाम भेलके, सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालय पुणे चे कनिष्ठ लिपिक नितीन पदे, रेल्वे टपाल सेवा बी विभागाचे सुपरवायझर लक्ष्मण हुंबे, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय पुणे येथील प्रमुख लिपिक जगदिश शिंदे, हॅशटॅग मेन्स वेअर, कात्रज चे ओनर संतोष खुटवड, जिल्हा सत्र न्यायालय, पुणे चे कनिष्ठ लिपिक विशाल निकम, जेनेसीस इंटरनॅशनल कॉर्पो. ली. चे प्रोजेक्ट मॅनेजर नवनाथ वीर, प्रा आरोग्य उपकेंद्र, केतकावळे, पुरंदर चे आरोग्य सेवक भास्कर कारकुड, अभिनव पॉलिटेक्निक वडवाडी चे कार्यालयीन अधीक्षक संजय अंबिके, त्रिमूर्ती बॅग्स व कुशन्स चे देविदास पलंगे, रोमन लस्सी पुणेचे ओनर अंकुश रोमन, शिलेदार प्रतिष्ठान भोरचे संस्थापक अध्यक्ष राजेश महांगरे, बांधकाम व्यावसायिक महेंद्र कोंढाळकर, श्रीकृष्ण इलेक्टरीकल्स भोर चे ओनर सुनील भिलारे, अविनाश पवार, दीपक प्रधान, विज्ञानाचे उपक्रमशील शिक्षक संतोष देशमाने, जयवंत पवार, गोदरेज अपलायंसेस ली. विंग चे डेटा एन्ट्री ऑपरेटर विनोद पवार, हेमलता रोमन, अंगणवाडी शिक्षिका संगीता खुटवड, रंजना बांदल, बारामतीच्या शुभांगी पवार (आंबवले), रुची चिकन सेंटर चे ओनर संतोष गायकवाड, ऑईस्टर अँड पर्ल हॉस्पिटल पुणे चे व्यवस्थापक गणेश मोझर, वाहन विमा सल्लागार योगेश बुदगुडे, नवनाथ वीर, रिएटर इंडिया प्रा. ली. विंग येथील GST ऑफिसर राजू चव्हाण, उद्योजक राजेंद्र शेटे व चंद्रकांत रोमन, स्वामी समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स भोर चे सचिन इंजरकर, जलसंधारण विभाग, कोंढवा चे फैयाझ शेख, रेणुका एंटरप्रायजेस व स्टेशनरी भोर चे ओनर सचिन घोणे, औषध वितरक भगवान घोडेकर, अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज संघटनेचे पुणे जिल्हा सरचिटणीस संतोष घोणे व आपला आवाज केबल टी व्ही चॅनेल व न्यूज नेटवर्क चे विभागीय संपादक तथा पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्र चे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र खुडे आदी मित्रांचा स्नेहमेळावा आनंदात संपन्न झाला.

Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *