चिखलीत २० लाखांची घरफोडी

Written by

१५ नोव्हेंबर २०२२
पिंपरी
घराला कुलूप लावून देवदर्शनासाठी गेल्यानंतर चोरट्यांनी घरातील ४० तोळे दागिने आणि नऊ लाखांची रोकड चोरून नेली . ही घटना रविवारी दि . १३ दुपारी सोनवणे वस्ती , चिखली येथे उघडकीस आली . शरद पंडित सोनवणे ३३ , रा . सोनवणे वस्ती , चिखली यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार , अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी शुक्रवारी दि . ११ सकाळी त्यांच्या कुटुंबीयांसोबत देवदर्शनासाठी तुळजापूर , गाणगापूर , अक्कलकोट येथे गेले होते . दरम्यान , घर कुलूप लावून बंद होते . त्या वेळी अज्ञात चोरट्याने घराच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला . घरातून ११ लाख २३ हजार रुपये किमतीचे ४०.४ तोळे सोन्याचे दागिने आणि नऊ लाख रुपये रोख रक्कम असा एकूण २० लाख २३ हजारांचा ऐवज चोरून नेला.
 

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares