चंद्रकांत पाटलांच्या शाईफेक प्रकरणानंतर विधिमंडळातही शाई पेनावर प्रतिबंध

Written by

१९ डिसेंबर २०२२
चंद्रकांत पाटील यांच्यावर घडलेल्या शाई फेक प्रकरणानंतर विधानभवन परिसरातील सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर शाई पेन आले आहेत. विधिमंडळातही शाई पेनावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. आज पहिल्या दिवशी विधिमंळात येणाऱ्या सर्व व्यक्तीचे पेन तपासण्यात आले. शाईचे पेन नेण्यास बंदी घालण्यात आली.
पुणे येथे समता सैनिक दलाच्या सैनिकांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक केली. या प्रकरणी दोन लोकांसह एक पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर एका ठिकणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही कार्यक्रमात पत्रकारांचे पेन तपासण्यात आले. विधिमंडळाच्या अधिवेशनातही याचे पडसाद दिसून आले. आज पहिल्या दिवशी येथे येणाऱ्या सर्व व्यक्तीचे पेन तपासण्यात आले. त्यामुळे सरकारने शाई प्रकरणाचा चांगलाच धसका घेतल्याचे चित्र आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares