मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
७ एप्रिल २०२२
घोडेगाव
वयोश्री योजनेअंतर्गत दिव्यांगासाठी सहाय्यक साधने वाटप कार्यक्रमाचे नावनोंदणी ऑनलाईन पध्दतीने, घोडेगांव ग्रामिण रुग्णालय येथे घेण्यात आली. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या युवा नेत्या पुर्वाताई वळसे पाटील यांनी संपुर्ण तालुकाभर हा उपक्रम राबवला आहे तसेच कार्यक्रमास उपस्थित दिव्यांग बांधवांना त्यांनी यावेळी भेट दिली.
घोडेगांव पंचायत समिती गणातील २७४ दिव्यांग व्यक्तिंची यावेळी नोंदनी करण्यात आली असुन सदर दिव्यांग व्यक्तिंना सहाय्यक साधने लवकरच उपलब्ध होणार आहेत.अशी माहिती घोडेगांवच्या लोकनियुक्त सरपंच क्रांती गाढवे यांनी दिली.
या शिबिरासाठी घोडेगांव ग्रामिण रुग्णालयाचे अधिक्षक नंदु वनवे, उपसरपंच सोमनाथ काळे,भिमाशंकर साखर कारखान्याचे संचालक,अक्षयशेठ काळे,ज्योती घोडेकर,विजय थोरात,रुपाली झोडगे,सुषमा शिंदे,ज्योती निघोट,संतोष सैद,नवनाथ हुले,रविंद्र बंगाळ,स्वप्निल कोकणे,सखाराम काळे,यशराज काळे,वैभव मंडलिक, घोडेगावचे माजी उपसरपंच सुनिल इंदोरे,संतोष काळे,गणेश काळे,सुनिल दरेकर,रमेश वाजे,सुधाकर वाकचौरे,महेंद्र इंगवले,अमोल कोकणे, अभिजीत गाडे, विनायक कर्पे आदि उपस्थित होते.
Your email address will not be published. Required fields are marked *
Article Tags:
news