घर भावकीच्या भांडणातून तरुणाचा खून – सात जणांवर गुन्हा दाखल

Written by

घर भावकीच्या जुन्या भांडणातून कावळ पिंपरी (ता.जुन्नर) येथील रोहिदास बाबुराव पाबळे ( वय ३९ ) या तरुणाचा कोयत्या सारख्या धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृणपणे खून केल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे.आशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
सात पैकी चार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश
या प्रकरणी दिलीप रामा आटोळे (राहणार जांबुत ,तालुका शिरूर), सागर बंडू पाबळे( राहणार कावळ पिंपरी ,तालुका जुन्नर) , कुणाल संतोष बोरुडे वय २१ वर्ष सुफियान निसार आतार वय २४ वर्ष दोन्ही रा. अळकुटी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर त्याचे इतर चार साथीदार यांच्यावर संगनमताने खुन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.
या बाबत ताटे म्हणाले मयत रोहिदास पाबळे व सागर पाबळे, दिलीप आटोळे यांच्यात वाद होता. या वरून सागर पाबळे, दिलीप आटोळे यांच्या सांगण्यावरून दत्ता भाकरे व त्याच्या चार साथीदारांनी ९ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास रोहिदास पाबळे यांच्यावर कोयत्या सारख्या धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृणपणे खून केला. त्या नंतर आरोपी फरार झाले होते. या प्रकरणी वनीता रोहिदास पाबळे( वय २९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलीस तपासात सदर आरोपींनी संगनमत करून रोहिदास पाबळे याचा कोयत्या सारख्या धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृणपणे खून केल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणी आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना घटनास्थळी काडतूस आढळून आले आहे. या वरून फायरिंग झाल्याचा अंदाज आहे.आरोपींना लवकरच अटक केली जाईल. आशी माहिती स.पो. निरिक्षक ताटे यांनी दिली.

Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares