घरगुती गॅस चा काळाबाजार करणारी टोळी शिरूर पोलिसांच्या ताब्यात

Written by

रवींद्र खुडे
विभागीय संपादक 
२३ मे २०२२
शिरूर
दि २३ मे २०२२ रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास, शिरूर तालुक्यातील मलठण गावच्या हद्दीत, चौघा जणांना घरगुती गॅस च्या टाक्यांमधून व्यावसायिक गॅस च्या टाक्यांमध्ये, अवैधरीत्या गॅस भरताना रंगेहात पकडण्यात शिरूर पोलिसांना यश आले आहे.
यात गॅस चोरी करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व चढ्या दराने विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती शिरूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते व उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या सुचनांनुसार, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व त्यांच्या टीमने पहाटेच्या सुमारास गोपनीयरित्या छापा टाकून, दोन मालवाहतूक गाड्या १) महिंद्रा पीक अप क्र. एम एच १४ इ झेड ५२८१, २) महिंद्रा जेनियु क्र. एम एच १४ सी पी १३१५ ,तसेच भारत गॅस कंपनीच्या ८० टाक्या व एच पी गॅस कंपनीच्या १०० टाक्या, व्यावसायिक ९३ टाक्या, छोट्या ३ टाक्या, गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ४० पिन्स, एक इलेक्ट्रिक वजन काटा, गरम पाणी तापविण्यासाठी दोन लोखंडी टाक्या, दोन शेगड्या, एक लायटर असा सुमारे अकरा लाख, चार हजार, सहाशे पन्नास रु. चा माल हस्तगत केलाय.

यात चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची नावे अनुक्रमे,
(१) अमोल निवृत्ती फुलसुंदर (वय ३९ वर्ष, रा. मलठण, ता. शिरूर, जी. पुणे, (२) मलप्पा आमोशीद नरवटे (वय ३४ वर्ष, (३) बसवराज लक्ष्मण नानाजे (वय ३० वर्ष) (४) सिद्धराम विठ्ठल बिराजदार (वय ३१ वर्ष) राहणार पारिजात बंगल्यामागे बंगल्यामागे, कात्रज, असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्यावर शिरूर पोलिसांमध्ये गु र नं ३६४/२०२२, भा द वी कलम २८५, २८६, ३४ च्या जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबतची रीतसर तक्रार सहाय्यक फौजदार नजीम पठाण यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे करत आहेत. तसेच सदर छापा व गुन्ह्या बाबतचे पत्र शिरूर तालुका दंडाधिकारी यांना देण्यात आलेले आहे.
सदर कामगिरीत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, सहाय्यक फौजदार नजीम पठाण, पोलीस नायक अनिल आगलावे, गोपनीय पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र गोपाळे, पोलीस अंमलदार विशाल पालवे यांनी सहभाग घेतला होता.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares