ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्यास परवानगी

Written by

०१ डिसेंबर २०२२
ग्रामपंचायत निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने महत्वाचे आदेश दिले आहे. निवडणूक आयोगाने विशेष आदेश जारी करत ऑनलाइन आग्रह सोडून ऑफलाइन अर्ज भरण्याची परवानगी दिली आहे. राज्यभरात ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची लगबग सुरू असतानाच, निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने राज्यभरात गोंधळ उडाला आहे. वेबसाईट डाऊन झाल्याने अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. मात्र, आता निवडणूक आयोगानं ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्याची परवानगी दिली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी दिली आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares