‘गुलछडीतून’ शेतकऱ्याला वर्षाला साडे चार लाखांचा नफा

Written by

रामदास सांगळे
विभागीय संपादक
१९ नोव्हेंबर २०२२
बेल्हे
बोरी खुर्द (ता.जुन्नर) येथील संग्राम सोनवणे यांनी गुलछडी फुलाचे चांगले पिक घेतले असुन यामधुन त्यांनी चांगल्या प्रकारे नफा मिळणार आहे. शेतकरी संग्राम सुरेश सोनवणे १ एकर शेतात गुलछडी फुलाचे पिक घेण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी सुरवातीला अगोदरच पिक निघाल्यानंतर ती जमिन नांगरून टाकुन एक महीना तापत ठेवल्यावर ती जमीन रोटरून टाकुन सव्वा चार फुटाची सर काढली. यामध्ये नारायणगाव या ठिकाणी असलेल्या एका नर्सरी मधुन आणलेल्या रोपांची लागवड केली. लावगडीबरोबर २४.२४ व विशेष करून सेंद्रिय खताचा वापर मोठ्या प्रमाणावर केला. या वर्षी अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने शेतकऱ्यांची पिके पाण्याने सडुन गेलेली असताना देखील सोनवणे यांनी अतीशय काळजीने गुलछडी च्या पिकात पावसाचे साचलेले पाणी बाहेर काढुन दिले. यामुळे रोपे सडली नाही व वेळोवेळी औषधी फवारणी केल्याने पिक चांगले असुन लागवडी पासुन तिनं महीण्यानंतर फुले तोडायला आलेली असुन दररोज सरासरी ८ ते १० किलो फुले निघत आहे.
सोनवणे यांना आतापर्यंत या पिकासाठी एक ते सव्वा लाख रुपये खर्च आलेला असुन सध्या गुलछडीच्या फुलांना सरासरी १२० ते १५० रुपये बाजार भाव चालु असुन आतापर्यंत १०० किलो फुले विकलेली आहेत. हे पिक जवळपास तीन ते साडे तीन वर्षे चालते यामधुन वर्षाला त्यांना साडे चार लाख रूपयांचा नफा मिळणार आहे. सोनवणे यांनी एक चांगल्या प्रकारचे पिक घेतलेले असुन या कामात त्यांच्या आई प्रगती सोनवणे यांची मदत होत आहे. परीसरातुन त्यांचे हे पिक पाहण्यासाठी परीसरातुन अनेक शेतकरी भेट देत आहेत. तसेच त्यांणा यासाठी कृषी अधिकरी राजश्री नरवडे, सुजाता खेडकर, बाबाजी बांगर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares