गुजरात निवडणूक निकालावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Written by

०८ डिसेंबर २०२२
गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत आहेत तसतशा राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुजरात निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नाना पटोले म्हणाले, गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची आयात झाली. मुंद्रा पोर्टावर मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण, भय, भ्रष्टाचार या सर्व गोष्टींचा गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर झाला. जो निकाल आला त्याचं आम्ही स्वागत करतो. लोकशाहीत मतदानाच्या वेळी भय, भ्रष्टाचार आणि व्यसनाधिनता हे अपेक्षित नाही. आम्हाला गुजरातमध्ये ज्या कमी जागा मिळाल्या त्याचं आम्ही आत्मपरिक्षण करू. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस गुजरातमध्ये चांगली कामगिरी करेल.
पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर सुरतमध्ये दबावतंत्राचा वापर करण्यात आला. आयकर आणि ईडीने छापे टाकले. हे का विसरले जात आहेत. पहिल्या टप्प्यानंतर जाणीवपूर्वक भय निर्माण करण्यात आलं. दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह कामाला लागले आणि एक भयाचं वातावरण निर्माण केलं. मी त्यावर आक्षेप घेतला आहे. माझा निकालावर आक्षेप नाही, त्याचं आम्ही स्वागतच केलं आहे. व्यसनाधितनाच नाही, तर जो गुजरात आज निर्माण होतोय ते लोकशाहीला योग्य नाही. व्यसनाधिनता आहे म्हणून भाजपा जिंकली असा माझा आक्षेप नाही असंही नाना पटोले यांनी नमूद केलं.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares