२४ डिसेंबर २०२२
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारमधील आमदारांची ५० खोक्यांबाबत एसआयटी चौकशी करा, अशी मागणी केली आहे. त्यावपर प्रत्युत्तर देताना औरंगाबादेत संदीपान भूमरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंचांचा सत्कार आज भूमरे यांच्या हस्ते करण्यात आला.
संदीपान भूमरे म्हणाले, संजय राऊत फक्त आरोप करतात. एकदा यांनी दाखवून द्यायला पाहिजे. आमच्यावरचे आरोप सिद्ध करावेत. आमची चौकशीला तयारी आहे. संजय राऊतांकडून केवळ आमची बदनामी सुरु आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतच जनता आमच्या सोबत आहे, हे दिसून आलंय. खोके हा विषय नाही, त्यांना काही काम नाही. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दुसरा काही पर्याय नसून केवळ शिंदे गटाला बदनाम करण्याचं काम सुरू असल्याचं भूमरे म्हणाले. खोके आणि गद्दारच्या पुढे ते जात नाही. कोणताही घोटाळा झालेला नाही. सभागृहात उत्तर दिलं आहे. काहाही झालेलं नाही.
Your email address will not be published.

Article Tags:
news