खासदार डॉ.अमोल कोल्हेंच्या ड्रीम प्रोजेक्ट ला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा हिरवा कंदील !

Written by

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१४ मार्च २०२२
पुणे
अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या सुरूवातीलाच मोठी घोषणा केली. वढू- तुळापूर येथे शंभूसृष्टिसाठी २५० कोटी देण्याची व ‘संभाजी महाराज शौर्य पुरस्कार’ सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. आजच्या स्मृतिदिनी प्रत्यक्ष कृतीतून छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाचेही स्वागत डॉ.कोल्हे यांनी केले आहे. आजच्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हें च्या पाठपुराव्याला यश आले असून त्यांच्या ‘इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प’ या ड्रीम प्रोजेक्टला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा कंदील दिला आहे.
पुण्यात 300 एकर जागेवर ‘इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प साकारणार असल्याची घोषणा आज अजित पवार यांनी केली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सर्व उपचार पद्धती एकाच छताखाली आणण्यात येणार आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आल्याने खासदार डॉ. अमोल कोल्हे भरघोस निधी आणण्यात यशस्वी झाले असून मतदारसंघासाठी विकासकामांचा ओघ त्यांनी कायम ठेवला आहे.
खासदार डॉ.अमोल कोल्हेंच्या पाठपुराव्याला यश, पुण्यात ३०० एकर जागेवर इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प साकारणार!
शिरुर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या आजरांचे अद्यावत उपचार एकाच छताखाली देण्यासाठी महाराष्ट्रासाठी पहिली ‘इंद्रायणी मेडिसीटी’ उभारण्यात येणार असून यामध्ये विविध प्रकारच्या आजरांसाठी २४ विभागांच्या स्वतंत्र इमारती निर्माण केल्या जाणार असून या मेडिसिटीमध्ये १० ते १५००० रुग्णांवरती उपचार करण्याची क्षमता असणार आहे. इंद्रायणी मेडिसिटी हा भव्यदिव्य प्रकल्प ३०० एकरात साकारणार आहे.
अष्टविनायक मंदीर विकासासाठी मा. अजितदादा यांनी ५० कोटींचा निधी मंजूर केला. अष्टविनायकांपैकी ४ गणपती शिरूर मतदारसंघातील ओझर, लेण्याद्री, रांजणगाव व थेऊर येथे असल्याने डॉ. कोल्हेंनी अजित पवार यांचे आभार मानले! तसेच फुले वाड्यासाठी १०० कोटींचा निधी व आळंदी- केंदूर- पाबळ-वाफगाव-पेठ रस्ता रुंदीकरण व सुधारणा करण्यासाठी ८ कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याबद्दलही डॉ. कोल्हे यांनी सरकारचे आभार मानले!
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares