खामुंडी (ता.जुन्नर) गावच्या हद्दीतील खटकाळी नामे शिवारातील पाण्याने तुडुंब भरलेल्या दगडाच्या खाणीत एक दुचाकी मिळून आली असून अज्ञात चोराने दुचाकीचे टायर व पट्रोलची टाकी आणि नंबर प्लेट काढून घेऊन दुचाकीचा फक्त सांगाडा खाणीत फेकला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या परिसरातील बाळासाहेब सावळेराम शिंगोटे हे शेतकरी खाणी जवळून जात असताना खाणीतील पाण्यावर ऑइल तरंगताना दिसल्यामुळे त्यांचा संशय बळावला व त्यांनी सहकाऱ्याच्या मदतीने शोध घेण्याचे ठरवून लोहचुंबकाचा वापर करून पाहणी केली असता पाण्यात दुचाकी असल्याचे समजले त्यांनी ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांना माहिती दिली,ओतूर पोलीस स्टेशनचे हवालदार सचिन डोळस पोलीस शिपाई राजेंद्र बनकर वाहतूक वार्डन गोरक्ष गवारी, अमोल मडके यांनी घटनास्थळी त्वरेने धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने दुचाकीचा सांगाडा बाहेर काढून ताब्यात घेतला.याबाबत पुढील तपास ओतूर पोलीस करीत आहेत.

Article Tags:
news