खामुंडी जवळील बदगीच्या घाटात ७०० फूट दरीत स्कॉरपिओ कोसळून भीषण अपघात,अपघातात दोन जण ठार

Written by

खामुंडी – नगर पुणे जिल्ह्याला जोडणारा नजिकचा असणारा खामुंडी मार्गावरून पुढे अवघड असा बदगीच्या घाटात जांभळे येथील महिंद्रा स्कॉरपिओ (एम.एच.१६ बी.एच.६०२०)ही गाडी कोसळून भीषण अपघात झाला यामध्ये वाहन मालक नवनाथ पोपट हुळवळे (वय अंदाजे – ४०वर्षे,रा.जांभळे,ता.अकोले, जि.अहमदनगर) हे जागीच ठार झाले तर राहुल खंडू हुळवळे(वय – ४० वर्षे) रा.जांभळे,ता.अकोले,जि.अहमदनगर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आल्यानंतर त्यांचाही मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी(दि.१३)सायंकाळी अंदाजे सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
या घाटाचा मार्ग अतिशय अरुंद असून येथे मोठ्या प्रमाणात वळणावर चढण रस्ता आहे या ठिकाणी उंचीवरून काहीतरी कोसळले असल्याचे दृश्य येथील दैनंदिन फिरायला जाणारे भरत डुंबरे आणि इतर सहकारी यांनी बघितले. सामाजिक कार्यकर्ते विकास चव्हाण यांनी ओतूर पोलीस ठाण्याशी संपर्क केला.लागलीच ओतूर पोलीस घटना स्थळी पोहोचले.
खामुंडी येथील युवकांना या घटनेची माहिती मिळाल्यावर बदगी आणि खामुंडी येथील ग्रामस्थांनी सुमारे अडीच तास शर्थीचे प्रयत्न करून शोधकार्य केले. अखेर नवनाथ पोपट हुळवळे यांचा मृतदेह आढळला. ओतूर पोलिसांनी खामुंडी ग्रामस्थांच्या मदतीने झोळी करून मृतदेह बाहेर काढला व जखमी राहुल खंडू हुळवळे यांस आळेफाटा येथे खाजगी रुग्णालयात दाखल करत असताना त्याचा हीं मृत्यू झाला आहे. खामुंडीचे सामाजिक कार्यकर्ते अनिल बोडके,शांताराम बोडके,कुणाल डुंबरे,बाळासाहेब शिंगोटे,अक्षय शिंगोटे,पप्पू डुंबरे, मिलिंद भोर, अतुल शिंगोटे आदी सुमारे शंभर खामुंडी गावातील आणि परिसरातील लोकांनी शोध कार्यात महत्वपुर्ण शर्थीचे प्रयत्न केले. या अपघाताचा पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल केरूरकर करीत आहेत.दरम्यान सदर अपघात इतका भीषण होता की, गाडीचा पूर्ण चक्काचूर होऊन गाडी दरीत लोंबकळल्या अवस्थेत होती.

Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares