कोविड केअर सेंटरमधील कॅमेरे वायसीएममध्ये बसवणार

Written by

१७ नोव्हेंबर २०२२
पिंपरी
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने चिंचवडच्या ऑटो क्लस्टर येथे तात्पुरते रुग्णालय व भोसरीतील बालनगरी येथे कोविड केअर सेंटर सुरू केले होते . ते दोन्ही रुग्णालय बंद करण्यात आले असून , तेथील वैद्यकीय व इतर यंत्रसामग्री महापालिकेच्या रुग्णालयात वापरण्यात आली आहे . तेथे बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे यशवंतराव चव्हाण स्मृती ( वायसीएम ) रुग्णालयात बसविण्यात येणार आहेत.
ऑटो क्लस्टर व बालनगरी येथील सीसीटीव्ही कॅमेरे काढून ते वायसीएम रुग्णालयात लावण्यात येणार आहेत . त्याची एका वर्षांसाठी देखभाल व दुरुस्ती केली जाणार आहे . तसेच , जिजामाता रुग्णालयातील वॉर्ड , आयसीयू येथील सीसीटीव्ही यंत्रणेची एका वर्षांसाठी देखभाल व दुरुस्ती केली जाणार आहे . या कामासाठी विद्युत विभागाने २६ लाख ७८ हजार ५५८ दराची निविदा काढली होती . त्यात तीन ठेकेदारांनी सहभाग घेतला . फिनिक्स इन्फ्रास्ट्रक्चर्सची ३ टक्के कमी दराची २५ लाख ९ ८ हजार २०१ दराची निविदा पात्र ठरली आहे . त्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares