कॉस्मेटिक,हेल्थ आणि सलून चे पिंपरी-चिंचवड मध्ये भव्य प्रदर्शन

Written by

१० डिसेंबर २०२२
पिंपरी-चिंचवड
शनिवार दिनांक १० डिसेंबर २०२२ रोजी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सायन्स पार्कमध्ये कॅवोऑक्स (cavoks) सर्विसेस तर्फे पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच सीबीएस(cbs) एक्जीबिशनचे आयोजन करण्यात आले होते.ज्याच्या माध्यमातून कॉस्मेटिक,हेल्थ ,आणि सलून या क्षेत्रातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. एक्जीबिशन मध्ये मुंबई,पुणे आणि गुजरातहून ५० मेकअप आर्टिस्ट, ब्युटीशियन, आणि आणि कॉस्मेटिशन यांचे स्टॉल लावण्यात आले.
उद्घाटन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे यांच्या हस्ते संपन्न
एक्झिबिशन शनिवार दिनांक १० डिसेंबर ते रविवार दिनांक ११ डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये पार पडणार आहे. ज्याला पहिल्याच दिवशी पाच हजारहून अधिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच दिवसभरात विविद ब्युटी एक्सपर्टस तर्फे मोफत सेमिनार घेण्यात येणार आहे.या एक्सपोचे आयोजन कॅवोऑक्स सर्विसेस तर्फे अरविंद जैन आणि सुमित जैन यांच्याकडून करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून कॉस्मेटिशन बॉबी बजाज,संजय इंटरनॅशनल स्कूलचे संजय इंगळे, इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट राजू ओरपे,इंटरनॅशनल ट्रेनर सलून मॅनेजमेंट तर्फे शहानवाज शेख सर ,फॅशन कोरिओग्राफर मृणाल गायकवाड ,धुळे विधानसभा च्या आमदार पूजा नितीन खडसे,. कल्याणी महिला बहुउद्देशी संस्था तर्फे सुनीताताई मोडक व इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares