२४ डिसेंबर २०२२
बोदवड तालुक्यात ४४ गावांसाठी नव्याने पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यावरुन एकनाथ खडसे यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधाला. सभागृहात बोलताना आमदार खडसे म्हणाले, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्याला पाणीवाले बाबा असे म्हणून घेतात. केंद्राच्या माध्यमातून जलजीवन योजनेतून पाणी देण्याचे काम सुरू आहे. २४ तास शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र जेथे आवश्यकता आहे त्या ठिकाणी योजना न राबवता, ज्या ठिकाणी गरज नाही तेथे मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात असल्याचा आरोप आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे.
यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी खडसेंना प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्या कार्यकाळात ९० कोटी रुपये निधीतून या ४४ गावांना पाणी मिळाले. त्या गावांमध्ये १५ ते २० दिवसाआड पाणी मिळते, त्यामुळे नव्याने योजना मंजूर करण्यात आली आहे. केवळ सभागृहात नौटंकी करुन चालत नाही तर प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच आहे. ९ कोटी रुपये आमच्या काळात या गावांसाठी दिले तेव्हा पाणी मिळाले. मात्र त्यांनी दुसऱ्यांच्या खात्यावर, पोलिसांवर आरोप केले त्यांच्या काळात मुक्ताईनगरमध्ये चंदेल नावाचा पीआय सात वर्ष ठाण मांडून होता. मी केला तर काळू तुम्ही केला तर बाळू ही बाब चुकीची आहे, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Your email address will not be published.

Article Tags:
news