मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
११ मे २०२२
घोडेगाव
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.ना.श्री.दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या पत्नी मा.सौ.किरणताई वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, आज घोडेगाव पोलीस स्टेशन येथे सर्व महिला अंमलदार यांना पौष्टिक आहार अर्थात ड्रायफ्रूटस् किट देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला..! महिला आपले घर सांभाळून नोकरी करते,अशा वेळेस आपल्या तब्येतीकडे लक्ष देऊ शकत नाही,त्यामुळे त्यांना पौष्टिक आहार मिळावा या हेतूने ड्रायफ्रूटस् किट देण्यात आले.
सदर कार्यक्रम हा मा.अरविंद वळसे पाटील यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमात मा.अरविंद वळसे पाटील (रामा उद्योग समूह,मंचर), भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादाभाऊशेठ पोखरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने साहेब, पोलीस उपनिरीक्षक किशोर वाघज साहेब तसेच महिला पोलीस अंमलदार सहाय्यक फौजदार तुरे, महिला पोलीस नाईक काळे मॅडम ,व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित महिला पोलीस व इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व सर्वांचे आभार मानले.
Your email address will not be published. Required fields are marked *
Article Tags:
news