कामाला लागा, फायली हलवा : नाहीतर मनसे करणार हळदी कुंकू वाहण्याचे आंदोलन

Written by

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
१३ मे २०२२
शिरूर
मनसेच्या आत्तापर्यंतच्या अनोख्या आंदोलनांची सर्वांनाच ओळख आहे. त्यातल्या त्यात शिरूर तालुक्यातील मनसेच्या आंदोलनांची सर्वत्रच होत असते. आता मनसे ने एका अनोख्या आंदोलनाचा इशारा शासन व प्रशासनाला दिलाय. ते म्हणजे पटापटा कामे करा, कामांच्या फायली हलवा, नाहीतर त्या फायलींवर हळदी कुंकू वाहण्याचा कार्यक्रम करणार असल्याचा इशारा शिरूर तालुका मनसेचे अध्यक्ष तेजस यादव यांनी दिलाय.
याबाबत त्यांनी राज्याचे महसूल व वनविभागाच्या सचिवांना एक पत्र दिले असून त्यात म्हटले आहे की… “शासन निर्णय हे केवळ कागदावरच आहेत. त्यांची अंमलबजावणी होत नाही. शेतकऱ्यांची वणवण व हेलपाटे थांबवा. नाहीतर येत्या सात दिवसांत मनसे आंदोलन करेल” यात पुढे असेही म्हटले आहे की… “चासकमान प्रकल्पासाठी शिरूर तालुक्यातील गावांची बंदी करण्यात आली, त्यामुळे तेथील ३० ते ४० व्यवहारांवर हस्तांतरण बंदी आहे. वेळोवेळी त्यावर शासनाकडून निर्णय झाले. आता अलीकडेच ११ फेब्रुवारी २०२२ रोजी, हस्तांतरण व्यवहारांवर निर्बंध शिथिल करण्याकरीता शासन निर्णय करण्यात आला. पण त्याची अंमलबजावणी वास्तवात शिरूर तालुक्यातील निर्वि, निमगाव म्हाळुंगी, तळेगाव ढमढेरे, करंदी, केंदूर या गावांत झालीच नाही. म्हणजेच शेवटी बळीराजाला दोन्ही बाजूने त्रास त्यामुळे ती हतबल झाला आहे. कारण चासकमान प्रकल्पाच्या कॅनॉल चे काम अर्धवट आहे, त्यामुळे सिंचन अर्धवट व आणि खातेफोड, विक्री यावर यासाठी प्रशासनाची दारे झिजवावी लागत आहेत.” अशा आशयाचे पत्र शासनाला शिरूर तालुका मनसे ने दिले असून सोबत शासन निर्णयाचे संदर्भ ही जोडलेले आहेत.
संदर्भ :
१) दि ११ फेब्रुवारी रोजी हस्तांतरण व्यवहारांवर लादलेले निर्बंध शिथिल करण्याबाबतचा शासन निर्णय.
२) दि ४ मार्च २०२२ रोजी जिल्हाधिकारी (पुनर्वसन शाखा) यांचे अंमलबजावणी करण्याकरिता पत्र.
३) दि ३० मार्च २०२२ जिल्हाधिकारीब यांचे उपसचिव यांना पत्र.
४) दि ७ एप्रिल २०२२ तहसीदार शिरूर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र.
अशाप्रकारच्या संदर्भांसहित ११ मे रोजी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जर सात दिवसांत कार्यवाही झाली नाही, तर या सर्व कागदपत्रांवर हळदी कुंकू वाहण्याचा कार्यक्रम केला जाईल.

 
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *