१९ डिसेंबर २०२२
बेळगावात कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनला आजपासून ( १९ डिसेंबर ) सुरुवात होणार आहे. त्याला उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीककरण समितीचा मेळावा आयोजित केला होता. मात्र, या मेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आहे. तसेच, मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.
बेळगाव एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली आहे. बेळगावच्या माजी महापौर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी मेळाव्याला परवानगी देखील नाकारली आहे. यामुळे एक संतापाची लाट कर्नाटक सरकारविरोधी उमटली आहे.
Article Tags:
news