कर्नाटक काँग्रेसच्या बेताल नेत्याविरोधात भाजपाचे आंदोलन

Written by

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१२ नोव्हेंबर २०२२
पिंपरी
हिंदूधर्म आणि धर्मवीर छत्रपती संभजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणारे कर्नाटक काँग्रेसचे नेते सतीन जारकीवली याच्याविरोधात पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. कर्नाटक काँग्रेस प्रदेश समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीवली यांनी हिंदू हा पर्शियन शब्द असून, त्याचा अर्थ अत्यंत घाण आहे. हिंदू हा शब्द आमच्यावर का थोपवला जातोय? असा प्रश्न उपस्थित करीत आक्षेपार्ह विधान केले होते. तसेच, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना दिलेल्या ‘‘धर्मवीर’’ उपाधीचा व मराठ्यांचा अपमान करत धर्मवीर उपाधीसाठी मराठी लायक नाहीत, अशी मुक्ताफळे उधळली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह तमाम हिंदू बांधव आणि शिव-शंभूप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली मोरवाडी येथील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. काँग्रसेचा नेता जारकीवली याच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.
यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस अमोल थोरात, जिल्हा सरचिटणीस राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, राजेश पिल्ले, विलास मडेगिरी, संकेत चोंधे, गणेश यादव, प्रकाश जवळकर, देवदत्त लांडे, नाना डवरी, बापूसाहेब भोसले, कैलास सानप, किसन बावकर, अजय पाताडे, नंदू कदम, योगेश चिंचवडे, विजय शिनकर, प्रदीप बेंद्रे, दिपक नागरगोजे, कविता हिंगे, वैशाली खाडे, सौ कमलेश बरवाल, गणेश ढाकणे, मयुर काळभोर, दिनेश यादव, गणेश जवळकर, दीपक नागरगोजे,मुक्ता गोसावी, कोमल शिंदे, निखिल काळकुटे, प्रशांत बाराथे, विक्रांत गंगावणे, राजेश डोंगरे,शंकर लोंढे, मुकेश चुडासमा,बिभीषण चौधरी, डॉ हेमंत देवकुळे,सुरेश गादीया, नंदू कदम, संजय परळीकर आदी उपस्थित होते.
हिंदू धर्म अन् छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य
आमदार लांडगे म्हणाले की, हिंदू धर्माबाबत आम्हाला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ही आमची अस्मिता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीद्वारे अशा बेजबाबदार आणि अवमानकारक व्यक्तव्याचा निषेध होत आहे. शिवप्रेमी तरुणांमध्ये संताप आहे. काँग्रेसच्या ‘त्या’ नेत्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो.
 
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *