कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारचा खोटारडेपणा उघड केला आहे – रोहित पवार

Written by

२१ डिसेंबर २०२२
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्नाबद्दल खोटं बोलत असल्याचा गंभीर आरोप आज ट्विटरवरून केला आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत झालेली बैठक सीमाप्रश्ना संदर्भात नव्हतीच तर केवळ कायदा-सुव्यवस्थे संदर्भात असल्याचं सांगत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारचा खोटारडेपणा उघड केला आहे. आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चुकीची माहिती देऊन महाराष्ट्राची दिशाभूल का केली? असा सवाल रोहीत पवार यांनी केला आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चुकीची माहिती देऊन महाराष्ट्राची दिशाभूल का केली? – रोहित पवार
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची विधाने बघता काही गोष्टी स्पष्ट होतात. ते त्यांच्या केंद्रीय नेत्यांना महाराष्ट्राचे नेते ज्याप्रमाणे घाबरून आहेत, त्याप्रमाणे घाबरत नाहीत किंवा महाराष्ट्राच्या नेत्यांना जो केंद्रीय सपोर्ट नाही तो छुपा केंद्रीय सपोर्ट त्यांना आहे.किंवा येणाऱ्या निवडणुकीत तिकीट मिळणार नसल्याचा अंदाज आल्याने ते भावनिक विषय छेडून आपली बाजू भक्कम करत आहेत. पण ते काही असो महाराष्ट्र मात्र महाराष्ट्र सरकारप्रमाणे गप्प बसणार नाही,हे बोम्मई यांनी लक्षात घ्यायला हवे, असे ट्विट रोहीत पवार यांनी केलं आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares