ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा फ्रीझर गायब

Written by

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०५ मे २०२२
पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तिसऱ्या मजल्यावरील स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या फ्रीझरमध्ये झुरळ पडल्याचे आपला आवाजच्या बातमीने निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी तेथून फ्रीझर हटवण्यात आला. त्यानंतर आज १९ दिवस झाले तरीही त्या ठिकाणी नवीन फ्रीझर बसवण्यात आला नसल्याने ऐन उन्हाळ्यात तिसऱ्या मजल्यावर काम करणारे कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असल्याचे दिसते. त्याबाबत कर्मचाऱ्यांना विचारले असता कोण्हीही बोलण्यास तयार नाही पण खाजगीत नाराजी वेक्त करताना पाहायला मिळते.
पत्रकार कशात येणारे नागरिक आणि पत्रकारांनाही थंड पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नाराजी वेक्त होत आहे. त्यामुळे श्रीमंत आणि स्मार्ट असणाऱ्या महानगरपालिकेने लवकरात लवकर नवीन फ्रीझर बसवावा किंवा आहे तोच फ्रीझर दुरुस्त करून बसवण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होते आहे. आता पुन्हा केव्हा हा फ्रीझर बसवला जातो आणि थंड पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची, तिसऱ्या मजल्यावर येणाऱ्या नागरिकांची थंड आणि स्वच्छ पाणी पिण्याची तहान केव्हा भागवणार याची प्रतीक्षा सर्वांनाच लागलेली आहे .
याविषयी अतिरिक्त आयुक्तांशी बोलले असता त्यांनी विद्युत विभागाला नवीन फ्रीझर बसविण्यास सांगितले आहे असे सांगितले. पण १९ दिवस उलटूनही विद्युत विभागाचे अधिकारी पावसाळ्याच्या प्रतीक्षेत आहेत? असा प्रश्न नागरिकांना आणि तिसऱ्या मजल्यावरील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पडला आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares