एहसान फरामोश; संजय राऊतांच्या टीकेला बाळा नांदगावकर यांचे उत्तर

Written by

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१८ ऑक्टोबर २०२२
अंधेरी पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विनंती केली होती. राज ठाकरेंच्या पत्रावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. राज ठाकरेंनी भाजपाला पाठवलेलं पत्र हा एक स्क्रिप्टचा भाग होता अशी टीका राऊतांनी केली होती. संजय राऊतांच्या या टीकेला मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उत्तर दिलं आहे.
राऊतजी आपणांस सगळेच जण ओळखून आहेत, आपली तीच ओळख चांगली आहे. आजपर्यंत मी तुमच्या कोणत्याच टीकेला उत्तर दिले नाही, पण आजही तुम्ही राज साहेबांबद्दल गरळ ओकली. तुमच्या जडणघडणीत राज साहेबांची तुम्हाला खुप मोठी मदत झालेली आहे हे तुम्ही विसरले आहात.तुम्हाला जसे ओळखतात तसेच ओळखले जावे, “एहसान फरामोश” म्हणून तुमची ओळख होऊ नव्हे हीच सदिच्छा. म्हणून इथून पुढे तरी टिका करताना भान ठेवा. असं ट्विट बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.
“एहसान फरामोश” म्हणून तुमची ओळख होऊ नव्हे हीच सदिच्छा. म्हणून इथून पुढे तरी टिका करताना भान ठेवा.@rautsanjay61
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) October 17, 2022

 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares