एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, ३४ टक्के महागाई भत्ता लागू

Written by

१७ नोव्हेंबर २०२२
राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ३४ टक्के झाला आहे. राज्य सरकारकडून याबाबतच अधिकृत पत्र महामंडळांना पाठवण्यात आले आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. एसटी कर्मचारी गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवत होते,राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता असून, एसटी कर्मचाऱ्यां मात्र २८ टक्के भत्त्यावर समाधान मानावे लागत होते मात्र आता राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता जाहीर केला आहे. शिंदे-भाजप सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *