एक तुषार भाजपमधून राष्ट्रवादीत; दुसरा कधी ?

Written by

प्रभाग रचना झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड मध्ये राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे. सत्ताधारी भाजपला एकामागून एक धक्के देत भाजपातील नगरसेवक, नगरसेविका भाजपला राम राम करत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादीचे नेते बोलताना सांगतात की ‘ ये तो सिर्फ झाकी है पिक्चर अभि बाकी है ‘ त्यामुळे अजून २० ते २५ नगरसेवक राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करतील.
आज ऑटोक्लस्टर चिंचवड येथे भाजपचे आक्रमक नगरसेवक जे नेहमीच पक्षाच्या विरोधात जाऊन न पटणाऱ्या गोष्टींची पोलखोल करत होते. त्यांनी आज पिंपरी – चिंचवड चे पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वी मोशी चे नगरसेवक वसंत बोराटे नंतर नगरसेविका चंदा राजू लोखंडे आणि आज २४ फेब्रुवारी रोजी पिंपळे निलख येथील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी राजीनामा दिला. आता एक तुषार राष्ट्रवादी मध्ये आला दुसरा केव्हा येणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दुसरे तुषार किंवा त्यांच्या सौभाग्यवती मोरवाडीतून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे दबक्या आवाजात बोलले जाते. एक तुषार राष्ट्रवादीत गेला दुसरा केव्हा ? हा प्रश्न त्यांच्या प्रभागातील नागरिक आणि कार्यकर्त्यांना पडला आहे. तुषार कामठेंच्या राजीनाम्यानंतर दुसऱ्या तुषार यांच्या भूमिकेची चर्चा चांगलीच रंगली आहे.
राष्ट्रवादीच्या गोटात सत्ताधाऱ्यांचे एक एक नगरसेवक जस जसे सामील होत आहेत तसतसे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना असे राजकीय जाणकार सांगतात. जसे सत्ताधाऱ्यांचे नगरसेवक राष्ट्रवादी त गेले तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवकही भाजपात येतील असे भापकडूनही सांगण्यात येते. आता येणारा काळच सांगेल की कोणत्या पक्षाची ताकद जास्त असणार आहे. त्यात १३ मार्च ला पालिकेची मुदत संपत आहे. त्यानंतर प्रशासक बसणार असल्याने नंतर घडामोडींना वेग येऊन राजकीय उलथापालथ होणार असल्याचेही जाणकार सांगतात.

Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares