१२ डिसेंबर २०२२
उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करून टाकण्याचे आश्वासन शरद पवारांना देत भाजपमधून राष्ट्रवादी प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंसोबत राष्ट्रवादीचे निम्मे कार्यकर्ते नाहीत. अर्थात एकनाथ खडसे यांना असलेल्या विरोधामुळे राष्ट्रवादी देखील संपण्यात जमा असल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला. जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूकीत खडसेंचा पराभव करत भाजप, शिंदे गटाने बाजी मारली आहे. या निकालानंतर प्रतिक्रीया देताना गुलाबराव पाटील बोलत होते. गुलाबराव पाटलांनी केलेल्या आरोपाला खडसेंनी देखील प्रतिउत्तर दिले आहे.
सहकार विभागातील ही निवडणूक असल्याने राष्ट्रवादीने पहिल्यांदाच आपल्या बळावर ही निवडणूक लढवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची या ठिकाणी ताकद पाहायला मिळाली आहे. राहिला विषय राष्ट्रवादीचा तर ग्रामपंचायतीमध्ये शंभर टक्के ग्रामपंचायत राष्ट्रवादीने विजय केले असून शिवसेनेला तिथं कुठेही यश मिळाले नसल्याचा प्रतिउत्तर एकनाथ खडसे दिले आहे.
Your email address will not be published. Required fields are marked *

Article Tags:
news