उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी माती खाल्ली आणि बोटचेपी भूमिका घेतली – आशिष शेलार

Written by

१८ नोव्हेंबर २०२२
राहुल गांधींनी भारत जोडो पदयात्रे दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यावरून सध्या महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपाने राहुल गांधींच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. याशिवाय यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.
आशिष शेलार म्हणाले, खरं म्हणजे हिंदुस्तानची ज्यांच्याकडून अपेक्षा होती ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धवजींनी तरी बोटचेपीची भूमिका घेऊ नये, अशी अपेक्षा होती. पण उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी माती खाल्ली आणि बोटचेपीची भूमिका घेतली. केवळ मी, माझा पक्ष आणि माझ्या पक्षाला सत्ता देणारे सहकारी यासाठी स्वत:च्या वडिलांच्या विचारांना तिलांजली देऊन उद्धवजी तुम्ही बोटचेपी भूमिका का घेतली? हा आमचा सवाल आहे, अशी टीका आशिष शेलारांनी केली.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares