१५ डिसेंबर २०२२
सुषमा अंधारेंनी हिंदू देवी-देवता आणि साधु संतांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामुळे सुषमा अंधारे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सुषमा अंधारे यांच्यासोबत आता ठाकरे गटाच्या अडचणी देखील वाढण्याची शक्यता आहे. हाच मुद्दा पकडून आता भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे
आशिष शेलार म्हणाले, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस! अशी अखंड परंपरा असलेला महान वारकरी संप्रदाय हा जगाचा अभ्यासाचा विषय ठरला आहे. आणि इथे महाराष्ट्रात कोणीतरी कालपरवाच चर्चेत आलेल्या सुषमाताई अंधारे या वारकरी संप्रदायाचा अपमान करतात? वारकऱ्यांच्या श्रध्देची खिल्ली उडवतात? उद्धवजी हा महाराष्ट्रद्रोह नाही का? आपली त्यांना मुकसंमती आहे का? हिंदू देवदेवता आणि संत परंपरेच्या अपमानासाठी सुषमाताईंच्या नेतृत्वात नवी सेना उघडलेय का? तुम्ही विठ्ठलाच्या पुजेला गेलात, आणि पदस्पर्शही केला नाहीत त्याचाच हा पुढचा टप्पा आहे का? ‘ असं ट्विट शेलार यांनी केलं आहे.

Article Tags:
news