इंडिया सायकल फॉर चॅलेंज स्पर्धेत पिंपरी चिंचवडचा तिसरा क्रमांक

Written by

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१८ फेब्रुवारी २०२२
पिंपरी-चिंचवड
भारत सरकारच्यावतीने घेण्यात आलेल्या इंडिया सायकल फॉर चॅलेंज स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. दि. १ ते २६ जानेवारी २०२२ या कालावधीत जास्तीत जास्त सायकलिंगद्वारे पिंपरी चिंचवड शहरात (7369 किमी) प्रवास करण्यात आला. तर पहिल्या पाच शहरांमध्ये, इंदौर (10065 किमी), अजमेर (7565 किमी), जबलपुर (4114 किमी), जयपूर (3680 किमी) या सहभागी शहरांनी सायकल प्रवास केला.
दि. १ ते २६ जानेवारी २०२२ या कालावधीत पार पडलेल्या स्पर्धेत पिंपरी चिंचवड महापालिकेचे उप अभियंता सुनिल पवार, कार्यकारी अभ‍ियंता बापुसाहेब गायकवाड यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळवून यश संपादित केले. तर, संदेश खडतरे यांनी नववा क्रमांक प्राप्त करून पिंपरी चिंचवड शहराच्या लौकिकात भर घातली आहे. तसेच, फ्रीडम 2 वॉक & चॅलेंज स्पर्धेत मुख्य माहिती व तंत्रज्ञान अध‍िकारी निळकंठ पोमण, सह शहर अभ‍ियंता सतिष इंगळे यांनी देखील सहभाग नोंदवून स्पर्धेत उत्तम कामगीरी बजावली आहे. त्याचबरोबर, सायकलिंग, चालणे, जास्तीत जास्त किमी चालणे या स्पर्धेतही पिंपरी चिंचवड शहराने नंबर पटकाविला. या यशाबददल विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला.
उप अभियंता सुनिल पवार, कार्यकारी अभ‍ियंता बापुसाहेब गायकवाड ठरले विजेते
पर्यावरण प्रदुषण टाळण्यासाठी तसेच नॉन मोटराईज ट्रान्स्पोर्टला प्रोत्साहन देण्याकरीता देशातील सर्व शहरांना सायकलिंग आण‍ि वॉकींगची सवय लागावी, या उददेशाने केंद्र सरकारच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये, देशातील १०० हून अधिक शहरांनी India Cycles4Change Challenge सहभाग नोंदविला होता. राष्ट्रीय शहरी वाहतूक धोरण (2006) चा दृष्टीकोन बाळगण्याकरीता शहरांना सायकलिंग सारख्या वाहतुकीच्या पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेच्या माध्यमातून प्रोत्साहित करण्यात आले होते.
सायकलिंगसाठी अनुकूल शहरे, वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करणे, शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य सुधारणे, नागरिकांमध्ये संवाद वाढणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतु होता. पिंपरी चिंचवड शहरात सायकलींगला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Categories:
All News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares